सावली -ज्ञानदेव नवसरे धुंडाळताना जग हे तू मला भावली सोडले जरी सर्वांनी तू माझी माऊली सुखाचे दिवस संग सर्वांची तू प्रिय दुखाचे दिवस येती वाटे तू अप्रिय मज साज आनंदाचा सोबत असती असती हार दु:खाचा साथ न सोडती सफल कामाची साथ आली संगतीत विफल कामाची वाट केली सोबतीत प्रेरणेचा झरा तूही सोबत तुझाच काढतो माझा फोटो मी तर माझाच ...
*मला जिजाऊ व्हायचयं* 📝 *ज्ञानदेव नवसरे,नाशिक* www.dnyanvahak.blogspot.in होय मला जिजाऊ व्हायचयं अन्यायाविरुद्ध लढायचयं ||धृ|| आऊसाहेबांच्या संस्काराने महापुरूषांना जन्म दिला | स्वराज्य निर्मिती विचाराने सर्व समाज जागा झाला | गुलामगिरीतून समाज मुक्त केला | मला याच विचारांची ज्योत व्हायचयं. ||१|| मराठ्यांची अस्मिता जागी केली | गनिमांची ह्रदय भितीने धडधडली | परदेशी सल्तनती गडगडली | मला स्वराज्याचा अंगार व्हायचयं ||२|| आऊसाहेब म्हणजे रयतेच्या कल्याणाचा विचार | स्वराज्याच्या विचारांनी प्रेरणेचा संचार | शत्रूकडॆ होऊ नका लाचार | मला या लाचारीतून मुक्त व्हायचयं ||३||| जगात जन्मोत्सव साजे | डोलताशे नगारे वाजे | आई तूच दैवत माझे | स्वराज्याच्या विचारांना नमन करायचयं ||४|| स्वराज्य श्रद्धेचा पाईक घडू | स्वराज्याच्या विचाराने निकराने लढू| जनतेला गुलामगिरीतून काढू | या विचारांचा पाईक व्हायचयं ||५|| होय मला जिजाऊ व्हायचयं 🚩🚩 *स्वराज्य संकल्पिका,राष्ट्रमाता,राजमाता,आऊसाहेब जिजाऊ माॅसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*🚩🚩🚩🚩💐💐 *जय जिजाऊ | जय शिवराय |* 🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment