नवदुर्गा तू नवदुर्गा गं

*नवदुर्गा तू नवदुर्गा गं*

🖋 *ज्ञानदेव नवसरे*
*ATM महाराष्ट्र*
*www.dnyanvahak.blogspot.in*

कलियुगे
तू *सैनिक*
नवदुर्गा तू नवदुर्गा रं
संकटांना हसत स्वीकारते
दुश्मनांना धडा शिकवते
*तू देश रक्षण्या सावध गं*

कलियुगे
तू *शिक्षक*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
देशाचे भविष्य तुझिया हाती
मुलांसोबत गाते आईसम नाती
*तू घडविते उज्ज्वल देशाचा पाया गं .*

कलियुगे
तू *अधिकारी*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
गतिशील प्रशासनाचा तुझा निर्धार
सर्वसामान्याच्या अपेक्षांचा तू आधार
*तू भ्रष्टाचारी लोकांवर करती विशाल प्रहार गं*

कलियुगे
तू *शास्त्रज्ञ*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
सृजनशीलतेची आस तुला
नवशोधाचा ध्यास तुला
*तू सदैव देशील आनंदाचा श्वास गं*

कलियुगे
तू *पोलीस*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
गुन्हेगारांना शिकवते धडा
भरते त्यांच्या पापांचा घडा
*तुझा अन्यायाच्या विरूद्ध सदैव लढा गं*

कलियुगे
तू *डाॅक्टर*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
रोगांचा समूळ नायनाट करी
निरोगी जीवनाची कास धरी
*तू अर्पिते जीवन समाजचरणी गं*

कलियुगे
तू *इंजिनियर*  
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
रचियेते उपयुक्तेचा आराखडा
पेलते तंत्रज्ञानाचा गाडा
*तू समाजाच्या मदतीची किनार गं*

कलियुगे
तू *वकील*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
अन्यायाच्या विरुद्ध लढते
न्याय देण्या अविरत झटते
*तू रक्षिते संविधानाचा मान गं*

कलियुगे
तू *समाजसेवी*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
वात्सल्याचे ह्रदय भरले
कर्तव्याचे ऋण विरले
*तू रचला आदर्शांचा पाया गं*

कलियुगे
तू *नेता*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
समाजाचे  करते नेतृत्व
स्वतः चे गाजवते कर्तृत्व
*तू स्वीकारले समाजाचे दातृत्व गं*

*अरे पुरुषा*
हीच नव्हे
अनेक रुपे माझी त्यात मिळविली मी ख्याती
माझ्या कर्तृत्त्वाने गाजवली महिलांची  किर्ती
मुलामुलीत भेदभाव करूनी केली तुम्ही त्याची माती
कधी शिकणार तू भेदभाव न करता जोडण्या नाती
*भेदभावातच जगणार आम्ही की होऊ एक जगती?*

धन्यवाद🙏🏻

Comments

Popular posts from this blog

वाचनबाग कळमपाडा

सावली

मला जिजाऊ व्हायचंय