कुंभाळे

*मायेचे झाड*
👬👬👬👬👭👬👭👬

📝 *ज्ञानदेव नवसरे*

मायेचे झाड
त्याला
लळेचा पाड
म्हणजे
कुंभाळे

प्रेमाचा सूर
त्याला
भावनांचा धीर
म्हणजे
कुंभाळे

कामाचा परिवार
त्याला
उपक्रमांचे आवार
म्हणजे
कुंभाळे

कलागुणांचे दर्पण
त्याला
अधिकारी मार्गदर्शन
म्हणजे
कुंभाळे

सर्वांचे श्रम
त्यात
नवीन उपक्रम
म्हणजे
कुंभाळे

कितीही कौतुकाच्या ओळी लिहिल्या तरी कमी पडतील असे कुंभाळे केंद्राचा परिवार हा माझ्या आयुष्यातील शिक्षक म्हणून शिक्षण प्रवासातील पहिला टप्पा.
हा प्रवास कधीही संपू नये असेच वाटणारा.

आ.झोले साहेब ,आ.पागे साहेब अन आ.सहारे साहेबासारखी खंबीरपणे शिक्षकांना साथ देणारे केंद्र,बीटातील शिक्षण चळवळ अन धडपडीची मुळे गावागावात रुजवणारे आमचे अधिकारी.आपल्या कामाने उपक्रम, तंत्रज्ञान अन कामातील तत्परतेने गुणवत्तेची सावली देणारी आमचे सहकारी शिक्षक .

शाळाशाळातील उपक्रम अन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तेचा गंध संपूर्ण केंद्रात उधळणारे आमचे विद्यार्थी.
कला, क्रीडा ,स्काॅलरशीप अन सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आपल्या स्वतः चा ठसा उमठवणारे आमचे विद्यार्थी , शिक्षक अन पालकांना समाधानाचे गोड फळे चाखायला देणारे आमचे विद्यार्थी असणारे मायेचे झाड म्हणजे कुंभाळे.

आमचे मार्गदर्शक विश्वास राऊत सर, माजी केंद्रप्रमुख योगेंद्र पागे सर, शिक्षक मित्र माजी विस्ताराधिकारी संतोषजी झोले साहेब , नव्याने आलेले केंद्रप्रमुख मोतीरामजी सहारे सर आपण आमच्यावर माया केलीत.
केंद्रातील सर्वच शिक्षक सहकारी एकजीवाने राहतात अन केंद्राचे काम पुढं घेऊन जाण्यास मदत करु लागतात.
मायेने डोक्यावरून हात फिरवणारे पागे सर, कामासाठी कठोर पण तितकेच मायेने जवळ घेणारे सहारे सर, शिक्षकांशी कधीही अधिकार वाणी न गाजवणारे आमचे दिशादर्शक झोले साहेब आपल्या सहवासातील सुरूवातीचे दिवस हे सदैव स्मरणात राहतील.

मायेचा ओलावा देणारे कुंभाळे केंद्राचे शैक्षणिक वटवृक्ष आम्हाला नेहमीच आठवत राहणार आहे.
एकदिलाने काम करणारे आमच्या केंद्रातील शिक्षक हा मस्त आठवणींचा ठेवा आहे .


धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

वाचनबाग कळमपाडा

सावली

मला जिजाऊ व्हायचंय