कामाच्या माणसा....

स्वतः ची स्पर्धा स्वतः सोबत करणाऱ्या,
उज्ज्वल ध्येयाने प्रेरित काम करणाऱ्या लोकांना समर्पित कविता...

*कामाच्या माणसा......*

काम
चांगलं केलं काय अन वाईट केलं काय
टीका तर होतीच.

लोकांनी
कौतुक केलं काय अन टीका केली काय
फळं तर लागतीच.

फळं
चांगली आली काय अन वाईट आली काय
प्रयत्न तर होतीच.

प्रयत्न
सोपे झालं काय अन अवघड झालं काय
अनुभव तर मिळतीच.

अनुभव
भेटले काय अन सुटले काय
माणसं तर कळतीच.

माणसं
जोडली काय अन नाय जोडली काय
जीवन तर चालतीच.

जीवन
पूर्ण झाले काय अन अपूर्ण झाले काय
श्रेष्ठत्व तर येतीच.

श्रेष्ठत्व
मिळाले काय अन गळाले काय
आनंद तर भेटतीच.

धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

वाचनबाग कळमपाडा

सावली

मला जिजाऊ व्हायचंय