ते चार शब्द


     ते चार शब्द….
-- ज्ञानदेव नवसरे,नाशिक
www.dnyanvahak.blogspot.in

चार शब्द वंगाळ बोलण्यापेक्षा
चार पाऊल लांब गेलेलेच बरे
वंगाळ बोलून तोंड खराब करण्यापेक्षा
चार शब्द टाळलेलेच खरे || धृ ||

भावनांचे वृक्ष फुटती शब्दांच्या बीजांकूराने
वाईट शब्दांनी सुकती विश्वासाची पाने
चांगल्या शब्दांने उगवते संबंधाचे सोने
इतरांनाही मने असतात नीट बोला सारे ||१||

संबंधाच्या वादळात मन भरकटले
की कठीण जुळविणे नाते
चांगल्या विचारांच्या बँकेत
असायला हवे निर्मळ मनाचे खाते
संबंधात वंगाळ भावना नको
धरु शुद्ध विचारांची कास रे  || २ ||

कोण कोणाचे? कोण कशाला?
कोण किती? धावेल मदतीला
भाषा उपकाराची की मदतीची ?
नाते उद्देशाचे की प्रेमाचे ? वेळ साक्षीला
वंगाळ शब्द तोंडी नाते संबंधाचे मरे  ||३||

डोळ्यावरी विश्वास ठेव
घात करी शब्द ऎकलेल्या कानाचे
चार शब्द बोल प्रेमाने
मिटवी अंतर दुखावलेल्या मनाचे
जिव्हाळ्याचे चार शब्द करी
संबंधाची परीक्षा पास रे || ४ ||


धन्यवाद .

Comments

Popular posts from this blog

वाचनबाग कळमपाडा

सावली

मला जिजाऊ व्हायचंय