आभासी जगात

*आभासी जगात.....*

🖊 *ज्ञानदेव नवसरे , नाशिक*
*www.dnyanvahak.blogspot.in*

आभासी जगावर टीका करणारांना
आभासी जगाचा मोह कधी ना सुटला
आभासी जगातील नाते टिकविताना
संबंधाचा धागा कधी ना तुटला

योग्य वापर केला तर
सकारात्मक चैतन्याचे जाळे
केवळ मनोरंजन कराल तर
विशाल निराशाचे ताळे

आभासी जगातून लाखो
माणसं आली जोडता
चार भिंतीचा गाभारा संपवून
स्वतः ची नौका आली सोडता

आभासी जगातील उत्तुंग यशाची
माणसं भेटतात जेव्हा
मनी आनंदाला सीमा अन
पारावार राहत नाही तेव्हा

का? किती? कशाला? टीका करतो
या आभासी जगावर
आवडत नाही ना तुला हे जग
का राहतो वापरणारांच्या मागावर?

वापर योग्य आपला मिळती
आभासी जगाच्या  सौदर्याचे धडे
मला तर मिळाला आनंद या जगात
शिंपले मनी समाधानाचे सडे

धन्यवाद🙏🏻

Comments

Popular posts from this blog

वाचनबाग कळमपाडा

सावली

मला जिजाऊ व्हायचंय