कामाच्या माणसा
स्वतः ची स्पर्धा स्वतः सोबत करणाऱ्या, उज्ज्वल ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या लोकांचे कौतुक जितके होते तितकेच तिरस्कार अशा कृतिशील लोकांना समर्पित माझी कविता... *कामाच्या माणसा......* माणसांनी काम चांगलं केलं काय अन वाईट केलं काय टीका तर होतीच. कामाचे लोकांनी कौतुक केलं काय अन टीका केली काय फळं तर लागतीच. कामाची फळं चांगली आली काय अन वाईट आली काय प्रयत्न तर होतीच. कामाचा प्रयत्न सोपे झालं काय अन अवघड झालं काय अनुभव तर मिळतीच. कामाचे अनुभव भेटले काय अन सुटले काय माणसं तर कळतीच. कामाची माणसं जोडली काय अन नाय जोडली काय जीवन तर चालतीच. कामाचे जीवन पूर्ण झाले काय अन अपूर्ण झाले काय श्रेष्ठत्व तर येतीच. कामाचे श्रेष्ठत्व मिळाले काय अन गळाले काय आनंद तर भेटतीच. कामाचा आनंद शोधला काय अन विरला काय तृष्णा तर मिटतीच. Www.kavyavichaar.blogspot.in धन्यवाद 🙏🏻