Sunday, January 6, 2019

Online कामाचं रान पेटलं ,बहिष्काराला भेटलं

Online कामाचं रान पेटलं
बहिष्काराला भेटल

🖋 ज्ञानदेव नवसरे
      

खंडीभर कागदाच्या कचाट्यातून मुक्तता शिक्षक मागत होता
पेपरलेस कामाचे गुणगाण गाता गाता अपेक्षा त्याची करत होता

प्रशासनात सरल  बदल घडताहेत असं वाटलं काही
कागदावर लिहायला आटणार नाही आता गुरूजींची शाही

सुरु झाला सरलच्या समस्येंचा पाढा
वेळ पुरेना, समस्या सुटेना रात्रभर लढा

तंत्रज्ञानाची आवड घेतले प्रशिक्षण,मदतीला धावले तंत्रस्नेही  मित्र
सरलच्या विविध धमाक्यांनी समोर आले भलतेच चित्र

तंत्रस्नेही शिक्षक आहात म्हणजे नेमकं काय आहात?
शासनाच्या आदेशाचे पाय आहात की मुलांच्या गुणवत्तेची साय आहात?

तंत्राचा स्नेह घ्यावा मुलांच्या भविष्यासाठी न की प्रसिद्धीसाठी!
Online कामापोटी अवघडल्या डोळ्यांच्या पापण्या, तेही करताहेत पण सुविधा कधी पुरवणार ओलांडल्यावर साठी?

Online च्या अतिकामापायी वेळ मिळेना मुलांना, दुरावत चालली नाती,
मुलांची गुणवत्ता दूर राहिली तर online माहिती आहे सम माती

तंत्रज्ञानातील अपुरे आमचे ज्ञान, त्यावर प्रकाश पडतोय किती?
मेटाकुटीला जीव आला  Online काम मुलांसाठी किती अन प्रशासनासाठी किती?

Online कामाची काळासोबत गरज आहेच त्याचं महत्त्व जाणतोच की,
शिक्षकांची मानसिकता, अडचणी लक्षात न घेता लादलेल्या कामाने तो रडतोच की

Online कामाचा गेली दोन -तीन वर्ष आर्थिक भार संभाळला शिक्षकाने
खिशाला मोठी कात्री लावणारे कित्येक सुरु झाले दुकाने

Online online करताना कृतीची शाळा आमची हरवली
सरल सरल करता करता अवघड करुन शिक्षक जात तुम्ही रडवली

सरलच्या कामाने दिली होती पेपरलेस कामाची हमी
शिक्षकांनी स्वत:  काम करूनही सुविधा पुरवण्यात तुम्हीच कमी

Whats app च्या आदेशाने ,अन खंडीभर कागदाने झालोय आता हैराण
Online कामाच्या बहिष्काराच्या फुत्काराने गाजवतोय शिक्षक मैदान

धन्यवाद🙏🏻

No comments:

Post a Comment