Wednesday, October 31, 2018

कामाच्या माणसा

स्वतः ची स्पर्धा स्वतः सोबत करणाऱ्या,
उज्ज्वल ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या लोकांचे कौतुक जितके होते तितकेच तिरस्कार अशा कृतिशील लोकांना समर्पित माझी कविता...

*कामाच्या माणसा......*

माणसांनी काम
चांगलं केलं काय अन वाईट केलं काय
टीका तर होतीच.

कामाचे लोकांनी
कौतुक केलं काय अन टीका केली काय
फळं तर लागतीच.

कामाची फळं
चांगली आली काय अन वाईट आली काय
प्रयत्न तर होतीच.

कामाचा प्रयत्न
सोपे झालं काय अन अवघड झालं काय
अनुभव तर मिळतीच.

कामाचे अनुभव
भेटले काय अन सुटले काय
माणसं तर कळतीच.

कामाची माणसं
जोडली काय अन नाय जोडली काय
जीवन तर चालतीच.

कामाचे जीवन
पूर्ण झाले काय अन अपूर्ण झाले काय
श्रेष्ठत्व तर येतीच.

कामाचे श्रेष्ठत्व
मिळाले काय अन गळाले काय
आनंद तर भेटतीच.

कामाचा आनंद
शोधला काय अन विरला काय
तृष्णा तर मिटतीच.


Www.kavyavichaar.blogspot.in

धन्यवाद 🙏🏻

मला जिजाऊ व्हायचंय

*मला जिजाऊ व्हायचयं*

📝 *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
www.dnyanvahak.blogspot.in

होय मला जिजाऊ व्हायचयं
अन्यायाविरुद्ध लढायचयं ||धृ||

आऊसाहेबांच्या संस्काराने महापुरूषांना जन्म दिला  |
स्वराज्य निर्मिती विचाराने सर्व समाज जागा झाला |
गुलामगिरीतून समाज मुक्त केला |
मला याच विचारांची ज्योत व्हायचयं. ||१||

मराठ्यांची अस्मिता जागी केली |
गनिमांची ह्रदय भितीने धडधडली |
परदेशी सल्तनती गडगडली |
मला स्वराज्याचा अंगार व्हायचयं ||२||

आऊसाहेब म्हणजे रयतेच्या कल्याणाचा विचार |
स्वराज्याच्या विचारांनी प्रेरणेचा संचार |
शत्रूकडॆ होऊ नका लाचार |
मला या लाचारीतून मुक्त व्हायचयं ||३|||

जगात जन्मोत्सव साजे |
डोलताशे नगारे वाजे |
आई तूच दैवत माझे |
स्वराज्याच्या विचारांना नमन करायचयं ||४||

स्वराज्य श्रद्धेचा पाईक घडू |
स्वराज्याच्या विचाराने निकराने लढू|
जनतेला गुलामगिरीतून काढू |
या विचारांचा पाईक व्हायचयं ||५||

होय मला जिजाऊ व्हायचयं 🚩🚩

*स्वराज्य संकल्पिका,राष्ट्रमाता,राजमाता,आऊसाहेब जिजाऊ माॅसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*🚩🚩🚩🚩💐💐
*जय जिजाऊ | जय शिवराय |*
🚩🚩🚩🚩

आनंद आम्हाला झाला ...

*बाग आमची नटू लागली*
*सौदर्याला भेटू लागली*

🖋 *ज्ञानदेव नवसरे*
     *ATM,नाशिक*


*आनंद आम्हा झाला*
*जशी*------

मोरांची
पिसे फुलू  लागली.

चातकाची
प्रतिक्षा संपु लागली.

सौंदर्याचे
पक्षी येऊ लागले.

आनंदाचे
ढग गर्जू लागे.

निसर्गाचे
गीत गाऊ लागले.

*तशी*

*फुलांच्या*
*कळ्या उमलू लागल्या*

मुलांचा
आनंद डुलू लागला.

शाळेचा
रुबाब वाढू लागला.

धन्यवाद 🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

वाचनबाग कळमपाडा

📚📒📕🖌 वाचन बाग✏📙📘📚
                 -✏ज्ञानदेव नवसरे

        
शाळेतील झाडांवर पुस्तकांचे फुले
छंद आमचा वाचनाचा सांगती मुले
बसता बागेत शाळेचे सौदर्य खुले

वाचताना मुले जसा पाखरांचा थवा
प्रयत्न गुणवत्ता वाढीचा उपक्रम नवा
बागेत गोंधळ नको अभ्यासविषय हवा

किशोर, जीवन शिक्षण आमुचे पाहुणे
वाचताना तोंडातून हळूच निघते गाणे
उत्कृष्ट देऊनिया वाजवुया गुणवत्तेचे नाणे

शाळेच्या कुंपणाला सुंदर आमुची झाडी
सावलीत  पळवुया अभ्यासाची गाडी
लिहूनी वाचूनी गाठुया गुणवत्तेची वाडी

बाग गुणवत्तेची आवड लावी शाळेची
उदाहरणे सोडतो,मित्र जोडतो लळेची
शिक्षक सोबती काळजी मिटवी शंकेची

बागेत मुले पठति लिखति पश्यती
उपयुक्त वाढविण्या अभ्यासाची गती
अभ्यासाच्या सावलीत करितो उन्नती
धन्यवाद .

ATM नाशिक सन्मान सोहळा २०१७

*ATM नाशिक सोहळा*

             *कौतुकगीत*
       🖊 *ज्ञानदेव नवसरे*
                 *ATM नाशिक*


       *कौतुकाचा सोहळा*
💐🎇💐🏆🏆🏆💐🎆💐
अभिमानाने सांगतोय, डोळे झाले ओले
कौतुकाच्या वृक्षावर एकतेची फुले
गुणवंताच्या सन्मानास ATM नाशिक खुले || धृ||

दि.०८/१०/२०१७ ला ATM सदस्यांचा सन्मान झाला
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार्थी सोबत आनंद वाटला
*सोहळा आयोजित करण्या जिल्हा पुरस्कार्थी झोकला*
मनपा शाळा क्रमांक २९ ला ATM सदस्य दाटले ||१||

नियोजन करण्या जमली उदार, जमदाडे
गवळे ,लांडगे,गायकवाड ,माऊली उचली जबाबदारीचे खडे
परिवारात निमंत्रण येता सदस्यांना आनंद झाला गडे
ट्राॅफी नियोजन करण्या सर्व दुकानदारास भेटले ||२||

सर्वांनी मिळून केली ट्राॅफीची निवड
ट्राॅफीसाठी  जमदाडे ,पुस्तकांसाठी विलास काढी सवड
मोनाताई घेती साडी, त्यांना साडीची आवड
गायकवाड परिवार उचली सत्काराची कावड
उदार चर्चा करती, त्यांच्या लेखणी ने मार्ग निघले ||३||

मान्यवर निमंत्रण देण्यात धाव घेती गवळे, माऊली
सुर्यवंशी साहेब भेटती बनती मदतीची सावली
निमंत्रण देण्यात विक्रम सरांची मदत घावली
शिक्षणाधिकारी साहेबांना निमंत्रण देण्यात चिंचोले साहेब बोले ||४||

निमंत्रण येता सोहळ्याचे सदस्यांची उपस्थितीची इच्छा
अडचणीवाल्यांनी दिल्या फोनवर शुभेच्छा
दिपक,खाडे,नारायण,नवनाथ,अरुणाताई, पौर्णिमाताई यांची भेट सदिच्छा
ATM संयोजक विक्रम सर सर्वांना हक्काने बोले ||५||

शिंदे ,उदार यांची यांची कार्यक्रमपुर्व तयारी
मोनाताई, जयदीप यांची सोबत त्यांना भारी
विलास जमदाडे यांनी कष्ट घेतले खरी
मान्यवर,सत्कारार्थी स्वागता शनिवारी वातावरण सजले ||६||

ज्योती,योगिता,मोना बहिणी काढती रांगोळी
कार्यक्रम आपलाच ,जणू आल्या आजोळी
जयदीप,सचिन यांनी आवरली सजावटीची पाळी
उदार यांची अफाट घाई सूचनांच्या वर्षावाने बोले ||७||

चिमुकल्यांनी सर्वांसोबत वर्धापनाचा केक लुटला
भरतच्या संमेलन व्हिडिओ ने मनी आनंद दाटला
चिमुकल्यांसोबत माझ्या बहिणींनी नाष्टा वाटला
उदार,घुगे यांच्या स्वच्छतेने सर्व कार्यक्रम पुरे झाले ||८||

नामासोबत छोटा बेलदार फोटो काढी
निमंत्रणास मान्यवर उपस्थित राहून आमचा सन्मान वाढी
भेटती सदस्य एकमेका,चालवी आनंद ,कौतुकाची गाडी
डोळ्यांच्या कडा ओल्या झाले बांधव निरोपाचे जेव्हा बोले ||९||

*आभार नव्हे कौतुक करतो सर्वांचे*
ATM नाशिक आधार व्हावा गुणवत्तेच्या नव्या पर्वाचे
जमून कौतुक करुन उचलू धनुष्य शिवकार्याचे  
अशीच We r one ची सोबत असुद्या, माऊली बोले ||१० ||

धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

तारीख

*तारीख*
📅📆📅📆

✍🏻 *ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
        *८००७६०६४०२*

*हातात नेहमी मोबाईल*
*मोबाईलवर लक्ष देतेय*
*_मोबाईलात असते की_*
*_तरीही तारीख विचारतेय_*

*दररोज फेसबुक तोंड*
*धुवायच्या आत उघडतेय*
*_फेसबुकात असते की_*
*_तरीही तारीख विचारतेय_*

*हातात घालतोय घड्याळ*
*घडी घडी पाहतयं*
*_घड्याळात ह्याच्या आहे की_*
*_तरीही तारीख विचारतेय_*

*तंत्रज्ञानाच्या अतिने*
*डोके ह्याचे भंजाळलेय*
*_धडा मिळाला की टीकेचा_*
*_आता तारीख सांगतेय._*

*धन्यवाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻

नवदुर्गा तू नवदुर्गा गं

*नवदुर्गा तू नवदुर्गा गं*

🖋 *ज्ञानदेव नवसरे*
*ATM महाराष्ट्र*
*www.dnyanvahak.blogspot.in*

कलियुगे
तू *सैनिक*
नवदुर्गा तू नवदुर्गा रं
संकटांना हसत स्वीकारते
दुश्मनांना धडा शिकवते
*तू देश रक्षण्या सावध गं*

कलियुगे
तू *शिक्षक*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
देशाचे भविष्य तुझिया हाती
मुलांसोबत गाते आईसम नाती
*तू घडविते उज्ज्वल देशाचा पाया गं .*

कलियुगे
तू *अधिकारी*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
गतिशील प्रशासनाचा तुझा निर्धार
सर्वसामान्याच्या अपेक्षांचा तू आधार
*तू भ्रष्टाचारी लोकांवर करती विशाल प्रहार गं*

कलियुगे
तू *शास्त्रज्ञ*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
सृजनशीलतेची आस तुला
नवशोधाचा ध्यास तुला
*तू सदैव देशील आनंदाचा श्वास गं*

कलियुगे
तू *पोलीस*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
गुन्हेगारांना शिकवते धडा
भरते त्यांच्या पापांचा घडा
*तुझा अन्यायाच्या विरूद्ध सदैव लढा गं*

कलियुगे
तू *डाॅक्टर*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
रोगांचा समूळ नायनाट करी
निरोगी जीवनाची कास धरी
*तू अर्पिते जीवन समाजचरणी गं*

कलियुगे
तू *इंजिनियर*  
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
रचियेते उपयुक्तेचा आराखडा
पेलते तंत्रज्ञानाचा गाडा
*तू समाजाच्या मदतीची किनार गं*

कलियुगे
तू *वकील*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
अन्यायाच्या विरुद्ध लढते
न्याय देण्या अविरत झटते
*तू रक्षिते संविधानाचा मान गं*

कलियुगे
तू *समाजसेवी*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
वात्सल्याचे ह्रदय भरले
कर्तव्याचे ऋण विरले
*तू रचला आदर्शांचा पाया गं*

कलियुगे
तू *नेता*
नवदुर्गा तू नवदुर्गा गं
समाजाचे  करते नेतृत्व
स्वतः चे गाजवते कर्तृत्व
*तू स्वीकारले समाजाचे दातृत्व गं*

*अरे पुरुषा*
हीच नव्हे
अनेक रुपे माझी त्यात मिळविली मी ख्याती
माझ्या कर्तृत्त्वाने गाजवली महिलांची  किर्ती
मुलामुलीत भेदभाव करूनी केली तुम्ही त्याची माती
कधी शिकणार तू भेदभाव न करता जोडण्या नाती
*भेदभावातच जगणार आम्ही की होऊ एक जगती?*

धन्यवाद🙏🏻