Monday, January 14, 2019

सावली

सावली
       -ज्ञानदेव नवसरे 

धुंडाळताना जग हे
तू मला भावली 
सोडले जरी सर्वांनी
तू माझी माऊली


सुखाचे दिवस संग
सर्वांची तू प्रिय
दुखाचे दिवस येती
वाटे तू अप्रिय 

मज साज आनंदाचा 
सोबत असती
असती हार दु:खाचा 
साथ न सोडती

सफल कामाची साथ
आली संगतीत
विफल कामाची वाट
केली सोबतीत 

प्रेरणेचा झरा तूही
सोबत तुझाच
काढतो माझा फोटो 
मी तर माझाच ...

No comments:

Post a Comment