Online कामाचं रान पेटलं बहिष्काराला भेटल ं 🖋 ज्ञानदेव नवसरे खंडीभर कागदाच्या कचाट्यातून मुक्तता शिक्षक मागत होता पेपरलेस कामाचे गुणगाण गाता गाता अपेक्षा त्याची करत होता प्रशासनात सरल बदल घडताहेत असं वाटलं काही कागदावर लिहायला आटणार नाही आता गुरूजींची शाही सुरु झाला सरलच्या समस्येंचा पाढा वेळ पुरेना, समस्या सुटेना रात्रभर लढा तंत्रज्ञानाची आवड घेतले प्रशिक्षण,मदतीला धावले तंत्रस्नेही मित्र सरलच्या विविध धमाक्यांनी समोर आले भलतेच चित्र तंत्रस्नेही शिक्षक आहात म्हणजे नेमकं काय आहात? शासनाच्या आदेशाचे पाय आहात की मुलांच्या गुणवत्तेची साय आहात? तंत्राचा स्नेह घ्यावा मुलांच्या भविष्यासाठी न की प्रसिद्धीसाठी! Online कामापोटी अवघडल्या डोळ्यांच्या पापण्या, तेही करताहेत पण सुविधा कधी पुरवणार ओलांडल्यावर साठी? Online च्या अतिकामापायी वेळ मिळेना मुलांना, दुरावत चालली नाती, मुलांची गुणवत्ता दूर राहिली तर online माहिती आहे सम माती तंत्रज्ञानातील अपुरे आमचे ज्ञान, त्यावर प्रकाश पडतोय किती? मेटाकुटीला जीव आला Online काम मुलांसाठी किती अन प्रशास...